जाहिरात
आपला जिल्हाक्राईम

गडचिरोली : शिवणी येथील २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार करणा­रा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी २४ तासात आरोपीला केले जेरबंद

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.४ मार्च)

गडचिरोली मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या शिवणी येथील २२ वर्षीय तरुणीवर दि. २ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजताचे सुमारास गावाबाहेर शौचास गेली असताना, अज्ञात आरोपीकडून सदर तरुणी एकटी असल्याचा फायदा घेत तरुणीला निर्दयीपणे मारहाण करुन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली होती. तरुणी बऱ्याचवेळा नंतरही घरी न आल्याने नातेवाईकांनी तरुणीचा शोध घेतला असता, ती गावाबाहेरील परिसरात बेशुद्ध स्थितीत आढळून आली होती.

तरुणीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते. गडचिरोली येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दि.३ मार्च २०२५ रोजी तरुणीला नागपूर येथील शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले होते. तरुणीवर अत्याचार झाला असल्याची शक्यता वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलेली होती.

घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या आदेशानूसार स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोस्टे गडचिरोलीची समांतर तपास पथके तयार करुन आरोपीचा शोध सुरु करण्यात आला होता.

उपचारादरम्यान आज दि.४ मार्च रोजी दुपारी सदर तरुणी आपले बयाण देण्यासाठी सक्षम असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्याकडून प्रमाणित करण्यात आल्यानंतर गडचिरोली पोलीसांकडून सदर तरुणीचे बयाण नोंदवून घेण्यात आले. पिडीत तरुणीच्या बयाणावरुन आरोपीविरुद्ध पोस्टे गडचिरोली येथे अप.क्र. १३१/२०२५ कलम ६४ (१), ६४ (२) (एल), ११५ भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बयाणादरम्यान तरुणीने सांगितलेल्या वर्णनावरुन आरोपीचे रेखचित्र पोलीसांकडून तयार करुन घेण्यात आले होते. सदर रेखाचित्रावरुन पोलीसांनी गोपनिय सुत्रांकडून माहिती मिळवत संशयित इसम नाव अनिल संतू उसेंडी, वय २३ वर्षे, रा. दोबे, ता. ओरच्छा, जि. नारायणपूर (छ.ग.) हल्ली मुक्काम शिवणी ता. जि. गडचिरोली यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आरोपीची कसून चौकशी केली असता, आरोपीने सदर गुन्हा केल्याचे पोलीसांसमक्ष कबूल केले आहे.

निलोत्पल,पोलीस अधीक्षक गडचिरोली.
¶¶¶
सदर प्रकारच्या गंभीर गुन्ह्रांमध्ये आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करुन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी गडचिरोली पोलीस दल प्रयत्नशिल राहिल.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button