जाहिरात
गडचिरोलीराजकीय

शासनाच्या सर्व योजनांचा लाभ जनतेला व्हावा याकरिता एमएलए कॅम्प

आमदार डॉ. देवराव होळीच्या हस्ते शुभारंभ

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि, ७ ऑगस्ट)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एमएलए कॅम्पच्या माध्यमातुन शासनाच्या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी व सर्वसामान्य जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा या करिता कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून माझ्या गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये ५० लोकांची टीम बनवून आपण मोठ मोठ्या गावात कॅम्पच्या माध्यमातून तर लहान गावामध्ये घरोघरी संपर्क करून शासन योजनांचे फॉर्म भरून जनतेला त्याचे लाभ मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी एमएलए कॅम्पच्या शुभारंभ प्रसंगी केले.

विवेकानंद नगर गडचिरोली येथे शासनाच्या योजनांची अंमलबजावणी एमएलए कॅम्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या एमएलए कॅम्पच्या माध्यमातून ईमारत बांधकाम कामगार कल्याण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्याचा आमदार डॉ. देवराव होळी यांचा मानस आहे.

याप्रसंगी प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी नगरसेविका लता लाटकर, एमएलए कॅम्प चे गौरव नागपूरकर, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे , तालुका महामंत्री बंडू झाडे ,शहर महामंत्री विवेक बैस, विनोद देवोजवार, प्राध्यापक ऊराडे, मोरेश्वर भांडेकर, रुपेश चौधरी यांचे सह पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button