सेवानिवृत्त शिक्षकांना रिक्त पदावर न घेता बेरोजगारांना संधी द्या, आझाद समाज पार्टीचे चौकात धरणे आंदोलन
आझाद समाज पार्टीने घातला आमदार डॉ.देवराव होळी यांना घेराव

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,७ ऑगष्ट)
शिक्षण विभागाच्या वतीने १५ जुलै २०२४ रोजी आदेश काढून त्यात पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षकांच्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याच्या सूचना क्र. १ नुसार देण्यात आल्या, गडचिरोली जिल्हा मागास जिल्हा आहे, त्यातच बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले असताना Ded, Bed, Med, Bped, Phd झालेल्या बेरोजगार तरुणांना रोजगार न देता, शासन ज्यांची कार्यक्षमता कमजोर होते म्हणून ५८ वर्षानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्त करते आता त्याच कर्मचाऱ्यांना परत रिक्त पदावर घेण्याच्या आज गडचिरोली येथे आझाद समाज पार्टी, जिल्ह्यातील इतर समविचारी पक्ष व संघटना तसेच बेरोजगार तरुणांच्या वतीने तीव्र धरणे आंदोलनातून खालील मागण्या करण्यात आल्या. या मागण्या पुढील ८ दिवसात पूर्ण न केल्यास प्रत्येक तालुक्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल व आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा आज झालेल्या आंदोलनातून सरकारला देण्यात आला.
एका बाजूला महाराष्ट्र शासन दीड हजार रुपये देऊन महिलांना लाचारीचा आमिष दाखवितात आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मुलांच्या नौकऱ्या – रोजगार हिसकावून घेतात, हा खरंतर त्या महिलांवर अन्याय आहे असा आरोप आझाद समाज पार्टीचे प्रभारी धर्मानंद मेश्राम यांनी केला.
त्या संदर्भात दोनदा मुख्यमंत्री यांना पत्र दिला होता, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने सुद्धा पत्र पाठविला होता. तथापि शासनाने निवृत्त शिक्षकांचे अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरु केली व जिल्ह्यातील १४३ तरुणांची संधी यामुळे हिस्कावण्यात आली. हा बेरोजगारांवर सरकार पुन्हा पुन्हा अन्याय करत असल्याचा आरोप आहे.
आंदोलनातील मुख्य मागण्या ¶¶
१) पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षक पदावर सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याची अट रद्द करण्यात यावी.
२) रिक्त पदावर जिल्यातील सुशिक्षित पात्र बेरोजगारांना घेण्यात यावे.
३) गडचिरोली जिल्हा हा मागास आदिवासी जिल्हा म्हणून अतीविशेष बाब अंतर्गत, ज्या प्रमाणे इतर भरतीत पेसा अंतर्गत काही अटी शिथिल केल्या जातात त्या पद्धतीने शिक्षक भरतीत TAIT, TET सारख्या अटी शिथिल करून DEd, Bed, Med झालेल्याना संधी द्यावी.
४) जर खाजगी शाळा, कॉन्व्हेंट मध्ये कित्त्येक शिक्षक TAIT नसताना शिक्षक म्हणून कार्यरत असताना आपण मान्यता देऊ शकता तर ही बाब विशेष मागास जिल्हा म्हणून आपण जिल्हा परिषद शाळेत शिक्षक भरतीसाठी शिथिल करूच शकता.

आमदार डॉ.होळी यांना आंदोलनकाऱ्यांचा घेराव
¶¶¶
इंदिरा गांधी चौकातील नियोजित धरणे आंदोलन संपताच आमदार डॉ.देवराव होळी यांना घेराव घालून निवृत्त लोकांचे अर्ज बाद करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आमदार डॉ.देवराव होळी यांच्याकडे तगादा लावून कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे भेट घेऊन चर्चा करण्यात आली आणि त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आझाद समाज पार्टी प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, कार्याध्यक्ष विनोद मडावी, महिला अध्यक्ष तारका जांभुळकर, भाकप नेते डॉ. महेश कोपुलवार, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या जयश्री जराते, जंगोरायताड महिला संघटनेचे अध्यक्ष आरती कोल्हे, विद्याताई दुगा, मालता पुडो, बिआयएन च्या उज्वला शेंडे, माळी समाज संघटनेचे सुखदेव जेंगठे, लहुजी शक्ती सेनाचे ज्ञानेश्वर पायघन, बावणे, रिपब्लिकन पक्षाचे विजय देवतळे, आदिवासी विकास परिषद सोनू कुमरे, नयन कुमरे, अंकुश कोकोडे, सुरज कोडापे, आसपा चे शोभा खोब्रागडे, सचिव प्रकाश बन्सोड, नागसेन खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत पेंदापल्लीवार, कुरखेडा अध्यक्ष सावन चिखराम, आरमोरी चे शुभम पाटील, करुणा खोब्रागडे, संगीता मोटघरे, सविता बांबोळे, प्रतिमा करमे, प्रतीक डांगे, सतीश दुर्गमवार, सुरेश बारसागडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
