जाहिरात
आपला जिल्हाराजकीय

तनुश्री आत्राम यांनी थेट शेतावर जाऊन साधला शेतकऱ्यांशी संवाद

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली(दि.२ ऑगष्ट)

गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तुनश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज धानोरा तालुक्यातील धानोरा, हेटी व अन्य गावांना भेट देऊन पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी थेट शेतावर जाऊन पुरामुळे बाधित झालेल्या शेतीची माहिती जाणून घेतली.

पीक परिस्थिती, खताची उपलब्धता याविषयीदेखील त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. किती क्षेत्र बाधित झाले, पंचनामे झाले काय, इत्यादी माहितीही तनुश्री आत्राम यांनी विचारली. शिवाय रोवणी करण्‌यासाठी आलेल्या महिलांचीही त्यांनी विचारपूस केली. यावेळी तनुश्री आत्राम यांनी पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांना प्लॉस्टिक रेनकोटचे वाटप केले. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करा, अशी सूचना तलाठ्यांना करुन तनुश्री आत्राम यांनी भरपाई मिळण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याची ग्वाही दिली. याप्रसंगी तलाठी कोडापे आणि शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button