जाहिरात
आपला जिल्हाताज्या घडामोडी

बांधकाम उपविभाग कार्यालय, धानोरा येथील कनिष्ठ अभियंता एसीबी च्या जाळ्यात

अभियंत्याने घेतली १ लक्ष ७० हजार रुपयांची लाच

Spread the love

लोकशाही न्युज, धानोरा (दि,२ ऑगष्ट)

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा बांधकाम उपविभाग कार्यालय येथील कनिष्ठ अभियंता अक्षय मनोहर अगळे वय-२९ वर्षे, (वर्ग-३) यांना १ लक्ष ७० हजार रुपयाची लाच घेताना एसीबी गडचिरोलीच्या पथकाने कारवाई केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांस दि. १९/६/२०२४ व दि. २७/६/२०२४ रोजी लाच मागणी पडताळणी केली असता आलोस अक्षय मनोहर अगळे, वय २९ वर्ष, पद-कनिष्ठ अभियंता, जिल्हा परीषद बांधकाम उप विभाग धानोरा, जिल्हा-गडचिरोली यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वतःचे आर्थिक फायद्या करीता वाम व भ्रष्ट मार्गाने तक्रारदारास मौजा-बोधनखेडा पोचमार्ग तुमडीकसा-हिरंगे, रंगगाव-गोटाटोल, मुरूमगाव-रिडवाही येथील सुधारणा केलेल्या कामाचे एमबी. देण्याकरीता १ लक्ष ७० हजाराची लाच रक्कमेची पंच साक्षीदारा समक्ष मागणी केली आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, अॅन्टी करप्शन ब्युरो, नागपूर, सचिन कदम अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, मा. संजय पुरंदरे अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधिक्षक चंद्रशेखर पी. ढोले यांचे पर्यवेक्षणात पो.नि.श्रीधर भोसले,राजेश पदमगिरीवार, संदीप उडान, संदिप घोरमोडे, प्रविण जुमनाके,प्रफुल डोर्लीकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button