जाहिरात
गडचिरोलीराजकीय

TICCI च्या माध्यमातून आदिवासीं बांधवांच्या उद्योग उभारणीला बळकटी मिळणार

नागपूर येथील आदिवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाला आमदार डॉक्टर देवराव होळी यांची हजेरी

Spread the love

गडचिरोली (दि,२१ ऑक्टोंबर)

आदिवासी उद्योजकता विकास कार्यक्रमातून आदिवासी बांधवांना मोठे उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असून ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज महाराष्ट्र (टिक्कीच्या) माध्यमातून आदिवासीं बांधवांच्या उद्योग उभारणीला बळकटी मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आदिवासी उद्योगजगता विकास कार्यक्रमाच्या नागपूर येथिल कार्यक्रमात केले.

अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर, ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज महाराष्ट्र, व महाराष्ट्र उद्योजकता विकास यांच्या विशेष सहकार्यातून आदिवासी उद्योगजगता विकास कार्यक्रमाचे आयोजन नागपूर येथील साई सभागृहामध्ये करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार डॉ देवराव होळी यांनी आवर्जून उपस्थित होते.

(आमदार डॉ देवरावजी होळी यांची कार्यक्रमाला प्रमुख हजेरी)

यावेळी मंचावर श्री गजानन भलावी अध्यक्ष ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज महाराष्ट्र , मा. रवींद्रजी ठाकरे अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर, श्री पार्लेवारजी संचालक एम एस एम इ, विशालजी अग्रवाल अध्यक्ष विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन नागपूर, गजेंद्र भारती उद्योग सहसंचालक उद्योग भवन नागपूर, यांचे सह विविध पदाधिकारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या धरतीवर ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ची निर्मिती झालेली असून त्यातून आदिवासी उद्योजक बांधवांना चांगले मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे आपण टिक्कीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button