जाहिरात
चंद्रपूरताज्या घडामोडी

एसटी बसची आमने-सामने धडक, २ गंभीर जखमी २५ प्रवासी किरकोळ जखमी

मुल - चंद्रपूर मार्गावर चिचपल्ली जवळ अपघात

Spread the love

लोकशाही न्युज, चंद्रपूर (दि,२३ जुलै)

चंद्रपूर वरून गडचिरोली येणारी एस टी बस व ब्रह्मपुरी वरून चंद्रपूर जाणारी एसटी बस यांचा चिचपल्ली जवळ भीषण अपघात झाल्याने २ बसचे चालक गंभीर जखमी तर २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची घटना आज दुपारी ३ वाजता च्या दरम्यान घडली.

महाराष्ट्र राज्य परिवहन बस क्रमांक एम एच ३३ सी यु ७४०३ ही एस टी बस चंद्रपूर वरून गडचिरोली ला येत होती. तर एम एच ४० वाय ५१६७ ही एस टी बस ब्रह्मपुरी वरून चंद्रपूर च्या दिशेने जात होती. चिचपल्ली जवळील पोलीस स्टेशनच्या वळणावर सदर बस समोरासमोर मोठ्या जोराने धडकल्या सदर अपघात झाल्यानंतर वाहतूक काही काळ खोडंबलेली होती.

सदर घटनेची माहिती रामनगर पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्यानंतर तेथील पोलीस आपल्या ताफ्यासह अपघात स्थळी पोहोचले व दोन्ही एस टी बस ला क्रेन च्या साहायाने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली व किरकोळ जखमींना चिचपल्ली रुग्णालयात भरती करण्यात आले व गंभीर जखमी असलेल्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button