लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
गडचिरोली (दि,२ ऑगष्ट)
गडचिरोली शहरा नजिक असलेल्या काॅंम्लेक्स सेमाना रोडवरील नवेगाव येथील संजीवनी उच्च प्राथमिक शाळा तथा संजीवनी विद्यालय नवेगाव येथे दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोज सोमवारला लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री डी डी सोनटक्के, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव मा. श्री सुनील पोरेड्डीवार तर मार्गदर्शक म्हणून महा अंनिस चे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प चे सहकार्यवाह श्री विलास निंबोरकर महा अंनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे, उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री चुटे सर व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भैसारे सर उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महा मानवांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. सर्व मान्यवरांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर विस्तृत माहिती दिली. त्यानंतर मुले वयात आल्यानंतर बऱ्याचदा कळत नकळत चुकीच्या मार्गाला लागून स्वत:चा जीवन खराब करतात ते टाळण्यासाठी त्यांना वेळीच सावध करण्यासाठी महा अंनिस च्या सहकार्याने वर्ग ५ ते १० वीच्या विद्यार्थ्यांना चित्रफिती द्वारे लैंगिक शिक्षणावर मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पी.एस. एडलावार यांनी तर आभारप्रदर्शन श्री यामावार सर यांनी केले. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
