जाहिरात
राजकीय

“शेकाप” ने साजरा केला पक्षाचा ७६ वा वर्धापनदिन

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,३ ऑगस्ट)

शेतकरी कामगार पक्षाचा ७६ वा वर्धापन दिवस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे यांच्या हस्ते भर पावसात ध्वजारोहण करुन लाल बावट्याला सलामी देण्यात आली.

यावेळी जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, महिला नेत्या जयश्री वेळदा, तुकाराम गेडाम, सरपंच दर्शना भोपये, देवेंद्र भोयर, तितिक्षा डोईजड, दिक्षा रामटेके, छाया भोयर, चंद्रकांत भोयर, विनोद मेश्राम, देवानंद साखरे, विजया मेश्राम, पुष्पा कोतवालीवाले, यशवंत मुरकुटे, राजकुमार प्रधान, हिराचंद कोटगले, योगाजी चापले, भीमदेव मानकर,गणेश बोबाटे, रामदास आलाम, महेंद्र जराते, बाबुलाल रामटेके, गायत्री मेश्राम, सुरज ठाकरे, दामोदर चुधरी, रेवनाथ मेश्राम, शुल्का बोबाटे, संगिता बोदलकर, अस्मिता लाटकर, धारा बन्सोड, कुसूम नैताम, गिता प्रधान, काजल पिपरे, मंगेश जराते, संतोष गेडेकर यांचेसह अनेक कार्यकर्त्यांची यानिमित्ताने उपस्थिती होती.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button