जाहिरात
गडचिरोली

जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी

पुरामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. २१ जुलै)

गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडले..

जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी संजय दैने यांनी भरपावसात विविध ठिकाणी ऑनफिल्ड उपस्थित राहत प्रशासकीय यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना त्वरीत राबवून घेतल्या तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना दक्षता घेण्याबाबत व मदतीबाबत आश्वस्त केले.

जिल्हाधिकारी संजय दैने यांनी चांदाळा कुंभी, तसेच आरमोरी, वडसा, कुरखेडा तालुक्यात भेट दिली. त्यांनी यावेळी नागरिक व शाळकरी मुलांशी संवाद साधला. नागरिकांनी काळजी घ्यावी, पूलावर पाणी वाहत असतांना घाईगडबडीत पूल ओलांडू नये, विजा चमकत असतांना झाडाखाली उभे राहू नये, मानवी चुकांमुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी होवू नये याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले. तसेच प्रशासकीय यंत्रणेला परिस्थितीवर बारीक नजर ठेवून अलर्ट राहण्याचे व नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना नियमितपणे राबविण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी संजय दैने यांचेसमवेत उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे कृष्णा रेड्डी, निलेश तेलतुंबडे, तहसिलदार हेमंत मोहरे, पोलिस अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, स्थानिक आपदा मित्र व नागरिक मदत उपस्थित होते.

अतिवृष्टीदरम्यान शाळा प्रशासनाने सुट्टीचा निर्णय घ्यावा
¶¶¶
जिल्ह्यात अतिवृष्टी बाबत हवामान विभागाने दिलेला इशारा व कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्या देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता ज्या ठिकाणी शाळेच्या मार्गात नदी, नाले, पूल रपटा च्या पाण्यामुळे अडथळा निर्माण होत असेल तेथे सर्व व्यवस्थापनाच्या शाळा व महाविद्यालयातील मुख्याध्यापकांनी स्वतः निर्णय घेऊन आवश्यकतेनुसार सोमवारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले आहेत.

पुरामुळे जवळपास ३१ मार्ग बंद
¶¶¶
१) आलापल्ली – भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता. भामरागड
२) अहेरी मोयाबिनपेठा रस्ता वट्रा नाला ता. अहेरी
३) आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (गोलांकर्जी ते रेपनपल्ली-रोमनपल्ली भाग) ता. अहेरी
४) जारावंडी ते राज्यसिमा भाग ता.धानोरा
५) पोर्ला वडधा रस्ता ता. कुरखेडा
६) वैरागड जोगिसाखरा शंकरपुर चोप कोरेगाव रस्ता ता. वडसा
७) कुरखेडा वैरागड ता. कुरखेडा
८) करवाफा पोटेगाव रस्ता
९) गोठनगाव सोनसूरी रस्ता ता. कुरखेडा
१०) वडसा नवरगाव आंधळी चिखली रस्ता ता. देसाईगंज
११) लखमापूर बोरी गणपुर हळदीमाल नाला
१२)आलापल्ली – भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्ल कोटा नदी)
१३) भेंडाळा अनखोडा रस्ता ता. चामोर्शी
१४) मुल हरणघाट रस्ता दहेगाव नाला ता. चामोर्शी
१५) चांदेश्र्वर टोला रस्ता ता. चामोर्शी
१६) फोर्कुडी मारकंडादेव रस्ता ता. चामोर्शी
१७) वडसा नैनपुर विठ्लगांव रस्ता ता. कुरखेडा
१८) चिखली धामदिटोला रस्ता ता. कुरखेडा
१९) गोठनगाव चांदगाव रस्ता ता. आरमोरी
२०) आरमोरी रमाळा रस्ता ता. आरमोरी
२१) वैरागड कढोली रस्ता ता. आरमोरी
२२) पेंढरी ढोरगट्टा रस्ता बांडिया नदि ता. धानोरा
२३) भाडभिडी रेगडी देवदा रस्ता ता. चामोर्शी
२४) कोनसरी जामगड रस्ता ता. चामोर्शी
२५) सारखेडा भापडा रस्ता ता. धानोरा
२६) चामोर्शी फराळा मार्कडादेव रस्ता
२७) आरमोरी शंकरपुर रस्ता
२८) ठानेगाव वैरागड रस्ता
२९) गडचिरोली आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग
३०) गडचिरोली चामोर्शी रस्ता राष्ट्रीय महामार्ग
३१)गडचिरोली,मुल चंद्रपूर हा मार्ग सुद्धा रहदारीसाठी बंद झालेला आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button