याला संप म्हणायचा की महसुल कर्मचाऱ्यांचा विरंगुळा
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१९ जुलै)
गडचिरोली जिल्ह्यात मागील १५ जुलै पासून विविध ठिकाणी महसूल विभागाचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या माणसाचे कुठलेही काम होत नाही. सदर लोकशाही न्यूजचे प्रतिनिधी संप स्थळी गेले असता संप आहे की कर्मचाऱ्यांचा विरंगुळा असे चित्र त्यांना प्रत्यक्षात अनुभवास आले आहे.

(कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या)
सदर प्रतिनिधी गडचिरोली मुख्यालयातील उपविभागीय अधिकारी कार्यालय गडचिरोली त्यालाच लागून असलेले तहसील कार्यालय गडचिरोली येथे ठीक १२:३० वाजता पोहोचले असता त्या २०×१५ च्या सभा मंडपात कुठलाही कर्मचारी संप स्थळी हजर नव्हता व कार्यालयामध्ये प्रतिनिधींनी फेरफटका मारला असता त्या कार्यालयातल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या खुर्च्याखाली होत्या, तहसील कार्यालयाच्या एका ठिकाणी गेले असता पाच महिला कर्मचारी निवांतपणे गोष्टी हानीत बसल्या होत्या.

(खोलीत बसून विरंगुळा करत असलेल्या महिला कर्मचारी)
हेमंत मोहरे
प्रभारी तहसीलदार गडचिरोली
¶¶¶
सदर प्रतिनिधीने प्रभारी तहसीलदार हेमंत मोरे यांच्याशी सदर संपा विषयी माहिती जाणून घेण्यासाठी फोन केले असता त्यांनी फोन उचलला पण प्रतिनिधीशी कुठलाही संवाद साधला नाही.
