जाहिरात
दिन-विशेष

बाळकृष्ण सावसाकडे “आप” नेते यांच्या जीवनकार्याचा शैक्षणिक ते राजकीय प्रवास

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२० जुलै)

सन १९९६ पासून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील निमगाव (रांगी) २७ वर्षांपासून गणेश अलंकार विद्यालय निमगाव येथे प्रामाणिकपणे शैक्षणिक क्षेत्रात मुख्याध्यापक त्याच सोबत धानोरा तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष, गडचिरोली जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष कार्य करीत आहे. मनामध्ये सहज विचार सुचला की शैक्षणिक क्षेत्राच्या पलीकडे जाऊन जनसेवा केली पाहिजे. सामाजिक क्षेत्रात मोर्चे,आंदोलन केले आहेत त्यावेळेस सन २०११ मध्ये निमगाव येथील नागरिकांना मोतीबिंदू शिबिर राबवून मोफ़त चष्मे वितरण करण्यात आले.

सन २०१२ ला मुस्का-धानोरा जिल्हा परिषद क्षेत्रात उमेदवारी दाखल केली आणि पराभूत झाले.परंतु तळमळ होती की जन सेवा केली पाहिजे सन २०१४ मध्ये लोकसभेचे आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार माजी राज्यमंत्री डॉ रमेश गजबे याचा चिमूर -गडचिरोली लोकसभा क्षेत्राचा प्रचार दौरा केला तेव्हा पासून आम आदमी पार्टीत सक्रिय आहे सन २०१८ मध्ये अहेरी ,गडचिरोली विधानसभा क्षेत्राची निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.शेतकऱ्यांना जबरणज्योत जमिनीचे पट्टे मिळणे ,शेती विषयक तीन काळे कायदे बाबत आंदोलन,अनेक गावात शेतकरी संवाद यात्रा, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून आर्थिक मदत देण्यात यावी शासन व प्रशासनाकडे पाठ पुरावा करून आंदोलन केले.महिलाना सुरक्षा देवून स्वतंत्र दल निर्माण करण्यात यावे यासाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले.

सन २०१८ मध्ये दिल्ली चे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांची नांदेड येथे राज्य मुख्याध्यापक अधिवेशनात भेट घेऊन शैक्षणिक बाबीवर चर्चा केली.सन २०१९ मध्ये कोतवाल संघटनेच्या आंदोलनात सक्रिय सहभाग ,ओबीसी आंदोलनात सक्रिय सहभागी होवून पाठिबा,२७ ऑगस्ट २०२० ला गडचिरोली जिल्हा आप अध्यक्ष पदी नियुक्ती झाली तालुका चामोर्शी,गडचिरोली,धानोरा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना चंदन बीज वितरण केले,अवाजवी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण शुल्क वाढीवर नियंत्रण शिक्षणाधिकारी याना निवेदन व आंदोलन केलीत.आप चे राज्य सभेचे खासदार संजय सिंग यांच्या प्रचार सभेत सहभागी होवून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात प्रचार केला.जून २०२० मध्ये कोरोना काळात घरगुती व कृषी पंप वीज बिल माफ करा कुलूप ठोको आंदोलन,पेट्रोल, डिझेल इंधन दर वाढ विरोधात भोंगा आंदोलन ,धक्का मारो आंदोलन,ऑगस्ट २०२० मध्ये शहरात ऑक्सिमिटर ने ऑक्सिजन लेव्हल तपासणी हजारो रुग्णाची सेवा, अनेक शाळांना ऑक्सिमिटर वितरण, मे २०२१ कोरोना लस तात्काळ उपलब्ध करून द्या कोरोना काळात जनतेला धान्य व आर्थिक मदत,ऑक्टोबर २०२१ मध्ये राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी आंदोलनात सक्रिय सहभाग,आशा वर्कर यांच्या आंदोलनात सहभाग,कर्मचारी जुनी पेन्शन योजना
आंदोलन ,पूरग्रस्त गावाना भेट,शहरात खड्डे संदर्भात डोंगा आंदोलन आजही गावा-गावात जन संवाद साधून जनतेच्या समस्या जणून घेण्यात येत आहे आणि कार्य हे दीर्घकाळ ठिकत असतो शेवटच्या श्वासापर्यंत जन सेवा अविरत सुरू राहील याची ग्वाही देत आहे.

सरांना,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button