धक्कादायक- अनोळखी इसमाने चक्क विवाहित महिलासह सोन व रक्कम ही पळविली. चिमुर शहरातील प्रकार
प्रतीनीधी- प्रवीन वाघे,(दि,8 सप्टेंबर)
वेल्डिंग वर्कशॉप असलेले चिमूर येथील प्रतिष्ठित व्यापारी यांच्या घरून त्यांच्या पत्नीला एका अनोळखी इसमाने दिनांक 04/09/2022 रोज रविवारला दुपारी अंदाजे साडेअकरा-बारा वाजताचे दरम्यान घरून पळून नेले.
पतीने पोलीस स्टेशन चिमूर येथे वरील घटने बाबत तक्रार दिली असून चार दिवसानंतर अजूनही पळविलेल्या महिलेचा शोध लागला नाही. उंची अंदाजे पाच फूट, शरीराने साधारण, रंगाने गहुवर्ण, अंगात काळ्या रंगाचा सलवार कुर्ती अशा वर्णनाची तीस वर्षीय विवाहित महिला आढळल्यास 7588807620 या मोबाईल क्रमांकावर कळवण्यात यावे असे आव्हान करण्यात येत आहे.

घटनेच्या दिवशी पती दुकानात गेल्यानंतर अनोळखी व्यक्ती घरात प्रवेश करून त्याने महिलेला केळ दिले, तो तोंडाला मास लावून होता. काही वेळातच तो महिलेला पळवून घेऊन गेला. यावेळेस महिलेची 9 वर्षाची लहान मुलगी तापाने बेडवर पडलेली होती. बराच वेळ झाल्यानंतरही मम्मी घरी आली नाही म्हणून तिने पप्पाला अंदाजे दोन वाजता रडत रडत फोन करून वरील घटनेची माहिती दिली. शोधा शोध करूनही घरातून पळविलेल्या महिलेचा शोध न लागल्यामुळे पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली त्याच प्रमाणे दिनांक ८ सप्टेंबरला माल खरेदी करिता नागपूरला जातो म्हणून कपाटातील पैसे घेण्यास गेला असता कपाटात 47 हजार रुपये व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी कपाटात नसल्याचे समजताच अनोळखी इसमाने सोन व रक्कमही पळविण्याचे तक्रार पोलीस स्टेशन ला तक्रार कर्त्याने केली आहे. आरोपी अनोळखी इसमाचा मोबाईल नंबर 7218867340 असून MAHAKLA RANE या नावाने सिम कार्ड आहे. घटनेच्या दिवशी त्याने महिलेच्या मोबाईलवर सकाळी 10:41 वाजतां व्हाट्सअप मेसेज केल्याचे आढळले. वरील बातमीतील कोणतीही माहिती कोणाला माहीत झाल्यास 7588807620 या मो.नं. वर किंवा जवळच्या पोलीस स्टेशन ला कळवावे.
