जाहिरात
गंगाखेड

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वंच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार- मा. आ. सिताराम घनदाट मामा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार

Spread the love

गंगाखेड प्रतिनिधी (दि,७सप्टेंबर)

गंगाखेड विधानसभेचे विकासरत्न माजी आमदार सिताराम घनदाट (मामा) यांची दिनांक 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या वतीने एका पत्राद्वारे परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद नगरपंचायत व महानगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी संनियंत्रण पारदर्शक व प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठीच्या वतीने परभणी जिल्ह्यात समन्वय समिती गठीत करण्यात आली या समितीमध्ये माजी आमदार सिताराम घनदाट (मामा) यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली या निवडीबद्दल परभणी जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.


सिताराम घनदाट (मामा)यांची समन्वय समितीमध्ये निवड झाल्यामुळे आमचे च्या प्रतिनिधींनी दुरध्वनी वरुन संपर्क साधला असता परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी ची मोठी ताकद स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये असुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील याच दृष्टीकोणातून उमेदवार दिले जाणार आहेत परभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार असून परभणी जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस चा झेंडा फडकवणार असल्याचे यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button