जाहिरात
गडचिरोली

बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास व ३०,००० रू.दंड

Spread the love

गडचिरोली (दि,७ सप्टेंबर)

गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. उदय बा. शुक्ल यांचा न्यायनिर्णय

सविस्तर वृत्त असे कि, आरोपी  रामदयाल व्यंकट पचोरे वय ३६ वर्ष रा. कुदूशीटोला ता. चामोर्शी जि. गडचिरोली यांने दिनांक २३/०७/२०१८ रोजी यातील फिर्यादी वय २४ वर्ष ही घरी एकटीच असतांना अंदाजे १२.०० वा. दरम्यान जबरदस्तीने बलात्कार केला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून आरोपी विरोधात पोमके घोट येथे तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन चामोशी अप.क्र. १८६/२०१८ कलम ३७६ (१) भादवी कायदयान्वये गुन्हा नोदं करण्यात आला. आरोपीला दिनांक २३/७/२०१८ रोजी अटक करण्यात आली होती .

पोलीस यंत्रणेने तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरून आज दिनांक ०७/०९/२०२२ रोजी आरोपी नामे रामदयाल व्यंकट पचोरे वय ३६ वर्ष रा. कुदूर्शीटोला ता. चामोर्शी जि. गडचिरोली यास मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गडचिरोली यांनी कलम ३७६ (१) भादवी कायदयान्वये दोषी ठरवून १० वर्ष सश्रम कारावास व ३०,००० रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दंडापैकी २५००० हजार रूपये नुकसान भरपाई म्हणुन पिडीतेला देण्याचे आदेश देण्यात आले .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button