जाहिरात
आपला जिल्हा

बोदली येथे पांदण रस्ता कामाला झाली सुरुवात

१० वर्षापूर्वीचा वाद संपला

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१५ मे)

तहसिलदार गडचिरोली यांचे मौजा बोदली तलाठी साझा क्रमांक १० पांदन रस्ता खुला करणे प्रकरणातील पारित आदेश क्रमांक रामाक्र./०१/ एल.एन.डी-१०/२०२२-२३ दिनांक १६/१२/२०२२ च्या अनुषंगाने हेमंत मोहरे प्रभारी तहसिलदार यांचे मार्गदर्शनात चंदु एस.प्रधान, नायब तहसिलदार यांचे नेतृत्वात महसूल विभागाचे पथकासह पांदन रस्ता खुला करण्याकरीता दि, १४.०५.२०२४ दि, १५/०५/२०२४ रोजी मौजा बोदली ऊर्फ माडेतुकूम येथे उपस्थित झाले. पथकामध्ये रुपेश गोरवार मंडळ अधिकारी, अरविंद टेम्बुर्णे तलाठी, ग्रामसेविका कुमारी नैताम, उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालय गडचिरोली चे भूकरमापक व्ही.ए.रालबंडीवार, पि.बी.पराते, रोहयो चे श्री भाष्कर राउत, अेपीओ कु.वैशाली सिडाम तसेच पोलीस स्टेशन गडचिरोलीचे पोलीस हवालदार खुशाल कोसनकर, महिला पोलीस काँस्टेबल कु. आरती वाट, कोतवाल एम.आर.उईके, पी.डी.दर्रो यांचा समावेश आहे.

अर्जदार तुमदेव सुकरु नैताम रा.बोदली यांनी त्यांच्या खाजगी जमीनीकडे जाणारा रस्ता गैरअर्जदार शामराव रामचंद्र मडावी रा. बोदली यांनी अडविल्याने तक्रार अर्ज सादर केले होते. पांदन रस्त्याचा वाद मागील १० वर्षापासून सुरु होता. मौजा बोदली परिसरातील शेतक-यांना बारमाही वहीवाट, खरिप/रब्बी हंगाम, शेतीचे अवजारे व उत्पन्न माल ट्रॅक्टरने ने-आण करण्याकरीता मोठी समस्या निर्माण झाली होती. अर्जदाराने सदर प्रकरण सन २०२२ मध्ये तहसिल कार्यालय गडचिरोली येथे दाखल केले. प्रकरणात मौजा बोदली ऊर्फ माडेतुकूम व बोदली माल या दोन गावाच्या हद्दी वरुन खरपूंडी कडे जाण्यासाठी प्रचलित नकाशानुसार पांदन रस्ता देण्यात आला आहे. हा रस्ता मौजा बोदली ऊर्फ माडे तुकूम येथील स.नं. ७,८,९,१४,१५,१७,१८,१९ मधून जाण्यासाठी तत्कालिन तहसिलदार महेंद्र गणविर यांनी दि, १६/१२/२०२२ रोजी पांदन रस्ता मुकरर करुन आदेश पारित करण्यात केले. सिमांकन करुन काम सुरु करण्यात आले परंतु गैरअर्जदारांने पुन्हा रस्ता अडवून शासकिय कामात हस्तक्षेप केला. त्यामुळे पांदन रस्त्या परिसरातील शेतक-यामध्ये शेती अवजारे ने आन करण्याकरीता भांडण तंटे वाढत गेले. व प्रकरण अधिकच गुंतागुतीचे झाले होते.

नायब तहसिलदार चंदु प्रधान यांचे नेतृत्वातील पथकांने योग्य् नियोजन करुन दि,१४ व १५ मे या दोन दिवसामध्ये मौजा बोदली येथे मोक्यावर जाऊन भांडन – तंटे करणा-या शेतक-यांचे समुपदेशन केले. भूमि अभिलेख कार्यालया कडून पांदन रस्त्याचे पुन्हा सिमांकन करण्यात आले व त्याच दिवशी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने मधून ७३ मजूर लावून कामाचा शुभारंभ करण्यात आला. जास्तीत जास्त् मजूर वाढवून पुढील दोन दिवसात काम पूर्ण होणार आहे. यावेळी उपस्थित आकाश निकोडे सरपंच, देवेंद्र मेश्राम,तंटामुक्ती अध्यक्ष, राजेंद्र निकुरे, शामराव मडावी, तुमदेव नैताम, राकेश चौधरी, नितेश मडावी, महागु पिपरे, बाबुराव गेडाम, भैयाज कत्रोजवार, मेंगाजी कोडाप, रामचंद्र नैताम, जिवन पिपरे व परिसरातील सर्व बाधित शेतकरी उपस्थित राहून महसूल प्रशासनास सहकार्य केले व महसूल प्रशासनाचे कौतुक केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button