जाहिरात
गडचिरोली

वाघाच्या हल्ल्यात ६४ वर्षीय महिला ठार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१४ मे)
गडचिरोली मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबेशिवणी जवळील बामणी बीट क्रमांक ४११ मध्ये आज वाघाने केलेल्या हल्ल्यात ६४ वर्षीय महिला ठार झाल्याची घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर महिला हि तेंदुपत्त्याच्या तोडणीकरिता पहाटेलाच जंगलामध्ये गेली होती जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला चढवला व तिला ठार केले. मृतक महिलेचे नाव पार्वता बालाजी पाल (वय ६४ वर्ष) रा.आंबेशिवणी आहे.

सदर घटनेची माहिती गडचिरोली वन विभागाला देण्यात आलेली असून वन विभागाची टीम मौजा आंबेशिवणी येथील बामणी बीट मध्ये दाखल होऊन पंचनामा व पुढील कारवाई करत आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण तयार झालेले आहे सदर प्रकरणाची दखल घेत वन विभागाने मृतकाच्या परिवाराला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी जनतेने केलेली आहे या परिसरात वावरत असणाऱ्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा याप्रसंगी नागरिकांनी केलेली आहे.

सदर मृतक महिलेचे शव उत्तरीय तपासणी करिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button