जाहिरात
आपला जिल्हानक्षली घडामोडी

नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेले आयईडी स्फोटक पोलिसांनी केली नष्ट

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,६ मे)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ दरम्यान आय.ई.डी. हल्ले करण्याच्या योजनेत नक्षलवाद्यांनी टिपागड परिसरात (कोरची तालुक्यातील, ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्र पासुन १० किलोमीटर अंतरावरील ठिकाणी) काही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स जमिनीत पुरुन ठेवली असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाल्याने कोणत्याही संभाव्य घटना टाळण्यासाठी त्या भागात क्षेत्राचे शोध अभियान राबवुन आणि सुरक्षा दलांची जोरदार तैनाती करून स्फोटके नष्ट करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे काल टिपागड परिसरात एक निश्चित अचूक ठिकाण उघडकीस आले जिथे डोंगरावर ही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स पुरुन ठेवण्यात आले होते.

पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने ३ बी.डी.डी.एस. च्या पथकासह सी – ६० चे एक पथक आणि सी.आर.पी.एफचे एक क्यु.ए.टी पथक डंप शोध मोहिम राबविण्या साठी आणि गरज पडल्यास नष्ट करण्यासाठी तैनात करण्यात आले होते.

पोलीस पथकांनी घटना स्थळावरून हस्तगत केलेले साहित्य
¶¶¶
६ प्रेशर कुकर आणि स्फोटकांनी आणि गंजलेले लोखंडी तुकडे भरलेले ३ क्लेमोर पाईप्स देखील सापडले. उर्वरित ३ क्लेमोर पाईप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते. पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट सापडले. एकुण ९ आय.ई.डी. आणि ३ क्लेमोर पाईप्स बी.डी.डी.एस. पथकाच्या सहाय्याने घटनास्थळी नष्ट करण्यात आले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button