जाहिरात
क्राईम

१८ लक्ष रुपये किमतीच्या सुगंधित तंबाखासह, ४ आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२ मे)

महाराष्ट्र शासनाने सुगंधीत तंबाखु विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला असतांना सुध्दा गडचिरोली जिल्हयात शेजारील छत्तीसगड राज्यातुन मोठया प्रमाणात सुगंधीत तंबाखुची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि.२ मे रोजी मौजा ठाणेगाव येथील गंगाधर चिचघरे हा आपल्या साथीदारांच्या मदतीने छत्तीसगड राज्यातुन मौजा कुरखेडा – वैरागड मार्गे मोठया प्रमाणात प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची वाहतुक करुन आरमोरी हद्दीतील चिल्लर तंबाखु विक्रेत्यांना पुरवठा करणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती
पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांना देवुन त्यांचे नेतृत्वात योग्य ते नियोजन करुन पोलीस पथक मौजा वैरागड टी-पाइंट करीता रवाना करण्यात आले.

मौजा वैरागड टि-पाइंट चौकात पोलीस पथकातील अंमलदार यांनी सापळा रचुन दोन संशयीत चारचाकी वाहन येत असतांना दिसुन आल्याने सदर वाहनांना तात्पुरता अडथळा निर्माण करुन वाहन थांबवुन वाहनाची तपासनी केली असता दोन्ही वाहनात एकुण १८ लक्ष,२७ हजार रुपयाचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुसह आरोपी १) गंगाधर भाष्कर चिचघरे, वय ३९ वर्ष, २) महेश सुधाकर भुरसे, वय ३४, ३) सोमेश्वर भाष्कर चिचघरे, वय ३६,४) अमोल अनिल भुरसे, वय २९ सर्व रा. ठाणेगाव ता. आरमोरी, जि. गडचिरोली  हे आपल्या ताब्यात घेऊन वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने त्यांच्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता अन्न व प्रशासन विभाग, गडचिरोली यांचे ताब्यात त्यांना देण्यात आले आहे.

सदरची कारवाई गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button