जाहिरात
गडचिरोलीविशेष

तहसीलदाराचे निवासस्थान आहे की भूत बंगला ?

Spread the love

गडचिरोली (दि,२९ ऑक्टोंबर)

गडचिरोली जिल्हा मुख्यालय प्रशासकीय सेवेत काम करणारे अधिकारी वर्गाला मुख्यालय राहून जनतेची सेवा करण्यासाठी शासनाने बंगले बांधून दिले आहेत. बांधकाम विभाग अंतर्गत बनवलेल्या बंगल्यात अजूनही कुणीच राहत नसल्याचे चित्र आहे.

  ( हेच ते निवास्थान)

गडचिरोली येथेही असाच प्रकार आहे स्थानिक महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीच्या अगदी जवळच उपविभागीय अधिकारी याचा प्रशस्त बंगला आहे, त्यालाच लागून तहसीलदार यांच्यासाठी बांधकाम विभागाने बंगला बांधण्यात आला आहे पण त्या बंगल्यात कोणीच राहत नाही त्याच्याच बाजूला न्यायाधीशाचे निवासस्थान आहे तिथे न्यायाधीश राहतात पण तहसीलदार आपल्या बंगल्यात का राहत नाही असा जनतेला पडलेला सवाल आहे.

हा बंगला बांधला तेव्हापासून आजतागायत कुठलाही तहसीलदार या बंगल्यात निवासी म्हणून आलेला नाही ही बाब तेवढीच सत्य आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button