
गडचिरोली (दि,३० जुलै)
मुख्यालयापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या खरपुंडी या गावांमध्ये विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे कारण तयार झाले आहे,संबंधित खरपुंडी हे गाव बोथली उपकेंद्र अंतर्गत चालविल्या जात आहे पण या गावात आज घराघरात विविध आजाराने ग्रस्त रुग्ण असल्याने जनतेची चिंता वाढलेली दिसते पण आरोग्य विभाग या गोष्टीकडे कानाडोळा करत असून संबंधित आजारांवर तात्काळ औषधोपचार करण्याची गरज आहे .
जसे पावसाळ्याच्या दिवसात ताप, डेंगू, कालरा, हिवताप ,मलेरिया,सारख्या रोगाची साथ आज घराघरात पाय पसरवताना दिसत आहे वेळेवर दखल घेऊन आरोग्य विभागाने संबंधित गावात तात्काळ आपली चमू पाठवून वेळीच लक्ष द्यावे जेणेकरून भविष्यात येणाऱ्या मोठ्या रोगापासून आपल्याला वाचता येईल. अशी माहिती दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात वाल्मिक वासेकर व ग्रामवासीयांनी केली आहे .
साळवे सर
जिल्हा आरोग्य अधिकारी
👇👇
संबंधित खरपुंडी या गावात आरोग्य यंत्रणा काम करत आहे, औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे .
जे जे रोगी आहेत त्यांच्या रक्ताचे नमुने तपासल्या जात आहेत .
संबंधित मेडिकल ऑफिसर ला गावात पूर्णता लक्ष देण्याचे निर्देश दिलेले आहेत .
