जाहिरात
गडचिरोली

खासदार अशोक नेतेंना प्रांतिक तैलिक महासभेचा पाठिंबा

पत्रकार परिषदेतून दिली माहिती

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,१६ एप्रिल)

विदर्भातील तेली समाज संघटनेनी गडचिरोली – चिमूर व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे वृत्त दिशाभूल करणारे असून पाठिंबा दर्शविणाऱ्या ‘त्या’ संघटना चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याची माहिती महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे यांनी १४ एप्रिल रोजी हॉटेल वैभव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हा शाखा गडचिरोली च्या वतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविलेल्या निवेदनात गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांना पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे यांची स्वाक्षरी आहे.

तैलिक महासभा प्रांतिक अध्यक्ष प्रमोद पिपरे, मुक्तेश्वर काटवे, रमेश भुरसे, विलास नैताम, विलास भांडेकर, मनोहर शेट्ट, मिलिंद दूधबावरे, नितीन कुनघाडकर, एमडी चलाख,रमेश नैताम, उराडे सर, वैष्णवी नैताम,इत्यादी पत्रकार परिषदेला हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button