जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली लोकसभा निवडणुकीत १० उमेदवार रिंगणात,दोघांनी घेतली माघार

जिल्हाधिकाऱ्याची पत्रकार परिषदेतून माहिती

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,३०मार्च)

आगामी लोकसभा २०२४ च्या गडचिरोली- चिमूर(अ. ज.) लोकसभा क्षेत्रात १० उमेदवार रिंगणात तर २ उमेदवारांनी माघार घेत असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेतून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी माहिती दिली.पत्रकार परिषदेला जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव हजर होते.

राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यता प्राप्त पक्ष्यांचे उमेदवार व दिलेली चिन्ह
¶¶¶
अशोक महादेवराव नेते,भारतीय जनता पार्टी( कमळ),
डॉ. नामदेव दसाराम किरसान,इंडियन नॅशनल काँग्रेस यांना (हात),योगेश नामदेव गोन्नाडे,बहुजन समाज पार्टी( हत्ती)

नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार व चिन्ह
¶¶¶
धीरज पुरूषोत्तम शेडमाके,जनसेवा गोंडवाना पार्टी (चरखा),बारीकराव धर्माजी मडावी,बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पक्ष (सिटी),हितेश पांडूरंग मडावी,वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर),सुहास उमेश कुमरे,भीमसेना (ऑटो रिक्षा),

इतर उमेदवार
¶¶
करण सुरेश सयाम,अपक्ष (ऊस)
विलास शामराव कोडापे,अपक्ष (दूरदर्शन)
विनोद गुरूदास मडावी,अपक्ष (अंगठी) हे चिन्ह देण्यात आले.

या दोन उमेदवारांनी घेतली माघार
¶¶¶
मिलींद रामजी नरोटे(अपक्ष), हरिदास डोमाजी बारेकर (अपक्ष) या दोन उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असल्याची माहिती दिली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button