खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी केली एका निष्पाप उच्च शिक्षित युवकाची निर्घुण हत्या

लोकशाही न्युज, भामरागड (दि,१० मार्च)
उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमकें नारगुंडा हद्दीतील मौजा मर्दहुर गावातील रहिवासी असलेला युवक साईनाथ नरोटी, वय २६ वर्षे याची दि ९ मार्च २०२३ रोजी रात्री ९ वा. चे दरम्यान नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या केली. मृतक साईनाथ नरोटे हा स्पर्धा परिक्षेची तयारी करत असून, तो होळीनिमीत्त मर्दहुर आपल्या स्वगावी आला होता. आदिवासी समाजातील साईनाथ नरोटेचे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न होते.
अशा कित्येक युवक युवतींची स्वप्ने नक्षलवाद्यांनी उधळून लावली आहेत. तसेच नक्षलवादी जाणीवपूर्वक आदिवासी युवक युवतींना त्यांच्या स्वप्नाच्या आड येऊन त्यांची प्रगती रोखत आहेत वरुन आम्ही आदिवासी लोकांच्या विकासासाठी काम करीत असल्याचा ते दावा करीत आहेत व आदिवासी युवकांना शिक्षित होण्यापासून आणि चांगले भविष्य मिळविण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सदर गुन्हा पोलीस स्टेशन भामरागड याठिकाणी नोंद केला असून, सदर घटनेचा पुढील तपास पोलीस मदत केंद्र, नारगुंडा करत आहेत.
