महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची कार्यकारिणी जाहीर
नाशिक (दि,२३ जुलै)
नाशिक येथे नुकत्याच पार पाडलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणूक २०२२ व विशेष सर्वसाधारण सभेत मान्यवरांची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी सुनील पाटणकर वर्धा, कार्याध्यक्ष बालाजी पवार नांदेड, सरचिटणीस विकास सूर्यवंशी सांगली, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकर बुलढाणा यांची निवड झाली,
यांच्या निवडी बद्दल गडचिरोली वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष श्री. रविंद्र कांबळे, उपाध्यक्ष हेमंत अंडेलकर, सचिव लोमेश बांबोळे, कोषाध्यक्ष अनिल बाळेकरमकर, सहसचिव प्रशांत वाढई, प्रसिध्दी प्रमुख विक्की बडवाईक, कार्याध्यक्ष धिरज पतरंगे, तसेच संघटनेचे सदस्य दिलीप टेकरे, राजेंद्र गव्हारे, संजय आकरे, भास्कर कावळे, पुरुषोत्तम रोळे, संदिप आकरे, जयंत अर्जुनकर, अंकुश बोबाटे, मारोती बाळेकरमकर, शंकर नेताम, उमेश सोनटक्के इत्यादी सदस्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे .
