जाहिरात
आपला जिल्हाताज्या घडामोडी

ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत प्रचंड अनियमितता,काम झाले २२ ला फलक लागले २४ ला

सखोल चौकशी करा सचिन भुसारी यांची जि.प. सीईओ ला निवेदनातून मागणी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,२२ फेब्रुवारी)

गडचिरोली तालुका मुख्यालय पासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरमाडी या गावी ग्रामिण पाणी पुरवठा योजनेतंर्गत सन २०२२ या वर्षात जि. प. शाळा व अंगणवाडी केंद्र येथे पाणी पुरवठा नळ योजना राबविण्यात आली त्या योजनेत प्रचंड अनियमितता झाली असल्याने त्याची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी सचिन भुसारी यांनी जिल्हा परिषद सिईओ ला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सन २०२२ या वर्षात ग्रामिण पाणी पुरवठा विभाग जि. प. गडचिरोली अंतर्गत जिल्हा परिषद शाळा मुरमाडी येथे नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली असून सदर योजनेचा फलक दि. २०/०२/२०२४ ला लावण्यात आला आहे. पंरतु सदर फलकावर योजनेची किमत व निविदा किमत लिहलेली आहे. पंरतु झालेला खर्च तपशिलाप्रमाणे लिहण्यात आलेला नाही आणि फलकावर विंधन विहिर व्यास १५० मो. मी. खोली ६० मी. दाखवली आहे. पंरतु प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी विंधन विहीर उपलब्ध नाही.

(हेच ते फलक कामाच्या ठिकाणी असे अपूर्ण  लावले असलयाचे चित्र)

सदर योजनेची पाणी पुरवठा अंगणवाडी केंद्रातील हातपंप येथुन सुरु करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे अंगणवाडी केंद्र या ठिकाणी सुध्दा अंगणवाडी सौर ऊर्जा आधारित पाणी पुरवठा योजना सन २०२२ मध्ये राबविण्यात आली. पंरतु त्या ठिकाणी सुध्दा पूर्वी फलक लावलेला नव्हता त्या ठिकाणी दि. २०/०२/२०२४ ला फलक लावण्यात आला. फलकावर योजनेची किंमत २०९८४२/- रुपये आणि झालेला खर्च १९७९७७/- रुपये दाखविण्यात आलेला आहे. मात्र तपशिलाप्रमाणे कोणत्या उपांगावर वर किती खर्च झाला याची माहिती लिहलेली नाही,

तरी सदर योजनेची सखोल मौका चौकशी करुन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सचिन भुसारी यांनी केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button