गाव चलो अभियानात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते गावागावात जाणार
खासदार अशोक नेते याची पत्रकार परिषदेत माहिती

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,७ फेब्रुवारी)
संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टी तर्फे गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गाव व बुथ वर भाजपाचे प्रमुख पदाधिकारी मुक्कामी थांबणार असून या प्रवासी कार्यकर्त्यांकडून केंद्र व राज्यसरकारच्या योजनांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहचवीत मतदारांशी संपर्क साधणार असल्याची माहिती खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
हे अभियान येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यासाठी जिल्हा संयोजक म्हणून भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विधानसभानिहाय संयोजकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यात गडचिरोलीसाठी प्रकाश गेडाम, आरमोरीसाठी सदानंद कुथे तर अहेरीसाठी संदीप कोरेत यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय २४ मंडळांमध्ये २४ संयोजक नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाभरातील ९३३ बुथवर हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात सर्वसमावेशक बुथरचनेची तपासणी केली जाणार असून आवश्यक ते बदलही ते करतील.
आज झालेल्या पत्रपरिषदेला लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, विधानसभा विस्तारक दामोदर अरिगेला, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा सचिव रंजिता कोडाप, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, अनिल कुनघाडकर, विनोद देवोजवार,सलीमभाई यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
२०२४-२५ मधील सादर केलेल्या आर्थिक बजेट मध्ये वडसा -गडचिरोली रेल्वे मार्गासाठी भरिव १२० कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली.रेल्वेमार्गाचे काम जोमाने सुरू असुन राज्य सरकारकडूनही त्यांचा ५० टक्के वाटा या प्रकल्पासाठी मिळणार असल्याचे माहिती यावेळी खासदार अशोक नेते यांनी यावेळी दिली.
