जाहिरात
क्रीडागडचिरोली

अप्पर डिप्पर लिग स्पर्धेत मंगलयान ११ चॅम्पियन,

करंडक स्पर्धेत अग्नी ११ अजिंक्य

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली(दि,२९ जानेवारी)

दरवर्षीप्रमाणे यंदाही अप्पर डिप्पर व्हॉट्स अँप ग्रृपतर्फे पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्वसामान्यांसाठी १३ ते २८ जानेवारी या कालावधीत अप्पर डिप्पर प्रिमीयर लीग तसेच करंडक क्रिकेट स्पर्धा पार पडली.अंतिम सामन्यात मंगलयान ११ ने आठ गडी राखून गगनयान ११ संघावर बाजी मारली. मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार संघासाठी नाबाद २९ धावा करणाऱ्या अजय सहारे यांना देण्यात आला.

गगनयान संघाचे कर्णधार गजेंद्र डोमळे यांनी प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम षटकापासून सावधगिरीने खेळ सुरू असताना प्रथम तीन षटकापर्यंत संघाला धाव गती कायम राखण्यात यश आले पण मंगलयान ११ संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट गोलंदाजी करताना गगनयान संघाला १० षटक अखेरीस आठ बाद ६५ धावा पर्यंत रोखले. मारली मंगलयान संघाकडून गोलंदाजीत पंकज धोरमोडे, विजय सुनतकर, मनोज पिपरे, अजय सहारे, विभास विश्वास यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. ६६ धावांचा पाठलाग करताना अजय सहारे यांच्या नाबाद २९ धावांच्या खेळीने केवळ ६.५ षटकात ६८ धावांचा पल्ला गाठला व अप्पर डीप्पर चषक लीग स्पर्धेत चषकावर मंगलयान ११ संघाचे नाव कोरले.

अग्नी ११ व ब्रमोस ११ या दोन संघांमध्ये अप्पर डीप्पर करंडक स्पर्धेसाठी ५ सामन्याचे आयोजन केले होते त्यात अग्नी ११ ने ब्रमोस ११ वर ३ विरुद्ध २ च्या फरकाने विजय मिळवून अजिंक्यपद पटकाविले.

आय फॉर्म येथे झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली, लोकसभा समनव्यक प्रमोद पिपरे हे प्रमुख अतिथी,अनिल धामोडे देशोन्नती जिल्हा प्रतिनिधी,अविनाश वरघंटीवर, पीएसआय प्रमोद ढोरे, डॉ,अन्नता कुंभारे, डॉ. आत्राम, निखिलमंडलवर,यशवंत दुर्गे,अनुराग पिपरे,भोलू सोमनानी, यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट खेळाडू ना बक्षिस वितरण करण्यात आले.

उत्कृष्ट आलराउंडर चा पुरस्कार कुलदीप गौरकर,करंडक उत्कृष्ट फलंदाज अनुप साळवे,क्षेत्ररक्षक अनुप साळवे,उत्कृष्ठ यष्टीरक्षक निशांत कुंटवर,उत्कृष्ठ झेल अंकुश ममिडवर,
करंडक मन ऑफ सिरीज आकाश गभने,लीग बेस्ट बॅट्समन साजन खोब्रागडे, बेस्ट बॉलर विभास बिश्वास,
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुलदीप गौरकर,बेस्ट कॅच निखिल मंडलवर, बेस्ट यष्टीरक्षक नितीन चलाख, डमी प्लेयर पंकज घोरमोडे,मॅन ऑफ सिरीज प्रकाश खोबरे,हट्रिक फारुख शेख या सह झालेल्या टूर्नामेंट मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अप्पर डिप्पर व्हाट्सअप ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button