जाहिरात
आपला जिल्हा

१५ ऑक्टोबर ला जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी आक्रोश मोर्चा

२० हजार लोक होणार मोर्चात सहभागी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली ( दि. ११ ऑक्टोबर )

गैर आदिवासींचा आदिवासी क्षेत्रात होत असलेल्या घुसखोरीच्या च्या विरोधात आदिवासी समाजातील सर्व घटक, राजकीय व सामाजिक पक्षाचे प्रतिनिधी सर्व मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती आज दि. ११ ऑक्टोबर रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेतून समाजसेवक डॉ.देवाजी तोफा यांनी दिली आहे.

बंजारा व धनगर समाजाच्या एस. टी. प्रवर्गात आरक्षण मागणीच्या विरोधात व इतर महत्त्वाच्या मागण्यासाठी काढण्यात येत असलेल्या आदिवासी आक्रोश मोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आदिवासीना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. मोर्चा १५ ऑक्टोबर ला धानोरा रोड वरील शिवाजी महाविद्यालय येथून १२ वाजता निघून जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचणार आहे.

पत्रकार परिषदेला आदिवासी नेते माजी आमदार नामदेव उसेंडी, काँग्रेस सरचिटणीस ऍड.विश्वजीत कोवासे, ऍड. लालसू नगोटी,माजी नगरसेवक गुलाब मडावी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष भूपेश कुळमेथे, प्रशांत मडावी, देवराव अलाम, कुणाल कोवे, आंनद मडावी, मालता दुगा हे उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button