जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

१४ जानेवारी पासून अप्पर-डिपर क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा

सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन

Spread the love

लोकशाही न्यूज ,गडचिरोली  (दि,१३ जानेवारी)

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पत्रकार,डॉक्टर,कर्मचारी, व्यापारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांच्या यांच्या करिता अप्पर डिप्पर व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने रविवार, १४ जानेवारीपासून गडचिरोलीच्या जिल्हा स्टेडियमवर अप्पर-डिपर क्रिकेट प्रीमियर लीग व क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ८ वाजता गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षेत्राचे खासदार अशोक नेते राहणार आहेत तर आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपचे लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, सिटी हॉस्पिटलचे डॉ.यशवंत दुर्गे, गडचिरोली प्रेस क्लबचे अध्यक्ष नंदकिशोर काथवटे, सामाजिक कार्यकर्ते बलराम सोनमणी, डॉ.अनंता कुंभारे, पत्रकार अविनाश भांडेकर, अनिल धामोडे, नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार, डॉ.अद्वय अप्पलवार आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

जिल्ह्यात कार्यरत पत्रकार,डॉक्टर,कर्मचारी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये खेळाप्रती आवड निर्माण व्हावी, त्यांना व्यायामासाठी प्रवृत्त व्हावे यासाठी अप्पर-डिपर व्हॉट्सअॅप ग्रुपतर्फे दरवर्षी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये एकूण सहा संघांना स्थान देण्यात आले आहे. ज्यामध्ये चांद्रयान, शुक्रयान, अग्नी, मंगळयान, गगनयान आणि ब्रह्मोस टीमचा समावेश आहे.तर संघमालक तनुश्री आत्राम, डॉ यशवंत दुर्गे,डॉ अनंता कुंभारे, बलराम सोमनानी निखिल मंडलवार,अनुराग पिपरे असून या सर्व टीममध्ये पत्रकार,डॉक्टर,विविध शासकीय कार्यालयात काम करणारे कर्मचारी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button