जाहिरात
एटापल्ली

लॉयड्स इन्फिनिट फाऊंडेशनकडून हेडरी व मंगेर गावात ”आर ओ” युनिट्सचे उद्घाटन

Spread the love

लोकशाही न्युज,एटापल्ली (दि. १४ एप्रिल)

ग्रामीण भागात पायाभूत सुविधा सुधारण्याच्या आणि जनस्वास्थ्याला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, लॉइड्स इन्फिनिट फाऊंडेशन (LIF) ने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत हेडरी आणि मंगेर या गावांमध्ये अत्याधुनिक रिव्हर्स ऑस्मोसिस (RO) जलशुद्धीकरण यंत्रणांचे उद्घाटन केले आहे.

या उपक्रमाचा उद्देश स्थानिक ग्रामस्थांना वर्षभर स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची अखंडित सुविधा देण्याचा आहे.

उद्घाटन समारंभ प्रसंगी लाईफ च्या संचालिका कीर्ती रेड्डी,पुरसलगोंदी ग्रामपंचायतीच्या सरपंच अरुणा सडमेक यांचेसह भोलू सोमनानी, संजय चांगलानी, रोमित, डॉ. सलुजा, लॉइड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड (LMEL) चे मान्यवर टी. ए. भास्कर, सी. कुमारेशन, सुभाषिष बोस, साई कुमार, गणेश सेठी, अरुण रावत आणि सौरभ वालिया हे उपस्थित होते. या सोहळ्याला अनेक स्थानिक ग्रामस्थांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

आरओ युनिट्सचे उद्घाटन सरपंच व फाऊंडेशनच्या संचालिकांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी, नवीन जलशुद्धीकरण यंत्रणांमधून आलेल्या पाण्याचा पहिला घोट घेत मान्यवरांनी विश्वास व परिवर्तनाचे प्रतीक म्हणून एक सकारात्मक संदेश दिला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button