वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागात खळबळ

लोकशाही न्युज, सावली (दि,२५ डिसेंम्बर)
सावली वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या सामदा बुज येथील कक्ष क्रं. २०१ मध्ये एका शेतकऱ्याच्या अतिक्रमणीत शेतामध्ये वाघ मृतावस्थेत आढळुन आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि,२५ डिसेंबर) रोजी सकाळी वाघ मृतावस्थेत आढळून आला असून. सदर वाघ हा मादी जातीचा असुन जवळपास १ वर्षे वयाचा आहे.
चंद्रपूर जिल्हा हा वाघाचा जिल्हा म्हणुन प्रसिध्द आहे, दरम्यान सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रातील सामदा बुज बिटातील कक्ष क्रं.२०१ मधील रामदास देवतळे सामदा बुज यांच्या अतिक्रमित शेतात वाघाचा मृतदेह आढळला.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सावली वनकार्यालयाचे वनपरिक्षेत्राधिकारी वैभव राजूरकर, व्याहाड खुर्द उपवन क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक आर. जी. कोडापे व पथकाने घटनास्थळ गाठून वाघाच्या मृतदेहास ताब्यात घेतले व शवविच्छेदनास रवाना केले.
