जाहिरात
गडचिरोली पोलीस

पोलीस पाटलाच्या हत्येप्रकरणी एकास अटक

Spread the love

लोकशाही न्युज, एटापल्ली (दि,११ डिसेंम्बर)

एटापल्ली तालुक्यातील पोलीस पाटील लालसु वेळदा यांचे हत्येमधील आरोपी जहाल जनमिलिशिया अर्जुन सम्मा हिचामी, वय १९ वर्षे, रा. झारेवाडा, ता. एटापल्ली, जि.गडचिरोली याला दि,९ डिसेंम्बर ला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी टिटोळा गावातील युवकांच्या रोजगारासाठी झटणा-या पोलीस पाटलाच्या तो पोलीसांचा खबरी असल्याच्या कारणावरुन माओवादयांकडुन करण्यात आलेल्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता हे उघड झाले आहे.

पोस्टे गटटा (जांभिया) ता,एटापली जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. ७६/२०२३ कलम ३०२,३६ ड ४,१४३,१४७,१४८,१४९,१२०-ब भादवी, ३/२५ भारतीय हत्यार कायदा,१३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्ह्रात अटक करण्यात आलेली आहेत. तसेच टिटोळा ता.एटापल्ली जि.गडचिरोली येथील पोलीस पाटलाच्या हत्येमघ्ये अटक करण्यात आलेला तो पहिला आरोपी आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button