८ लाख ईनाम असलेले २ जहाल नक्षल्यांचे गडचिरोली एस. पी. समोर आत्मसमर्पण

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२४ जुलै)
२८ जुलै ते ३ऑगस्ट दरम्यान नक्षलवादी हे नक्षल शहिद सप्ताह पाळतात. या सप्ताहामध्ये नक्षलवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलांवर हल्ले करणे, खबरी असल्याच्या संशयावरुन निष्पापांच्या हत्या करणे, रस्ते बंद करणे, बंद पुकारणे, धमकावणे, जनतेकडुन पैसा वसूल करणे, ठेकेदाराकडुन खंडणी गोळा करणे इ. हिंसक कारवाया करत असतात.
२ जहाल नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली पोलीस अधीक्षक यांच्या समोर हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून आत्मसमर्पण केल्याची माहिती गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पाल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
२ आत्मसमर्पित दोन जहाल नक्षलवाद्यांना पोलीस अधीक्षकाच्या हस्ते शांततेचे प्रतीक पांढरा दुपट्टा तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
८ लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी अनुक्रमे नाव (१) अडमा जोगा मडावी, वय २६ वर्ष रा. जिलोरगडा, पो. पामेड तह. ऊसुर, जि. बिजापूर (छ.ग.) व (२)टुगे कारु वड्डे, वय ३५ वर्ष रा. कवंडे, पो. बेद्रे, तह. बैरामगड, जि. बिजापूर (छ.ग.) अशी जहाल नक्षलवाद्यांची नावे आहेत. आत्म समर्पित जहाल नक्षलवाद्यांच्या नावे विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्ह्याची नोंद आहे.
पत्रकार परिषदेला गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधिक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक (विशेष अभियान) चे अनुज तारे हे हजर होते.
