जाहिरात
गंगाखेड

लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी आयोजित भव्य सोलो डान्स स्पर्धा संपन्न

Spread the love

गंगाखेड(प्रतिनिधी)

लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी तर्फे आयोजित भव्य सोलो डान्स स्पर्धा दिनांक 21 ऑगस्ट रोजी क्रष्ण श्रेया मंगल कार्यालय(राजवाडा) येथे घेण्यात आली .या सोलो डान्स स्पर्धेत 100 पेक्षा जास्त स्पर्धकानी सहभाग नोंदवला.


या डान्स स्पर्धा साठी परिक्षक म्हणून नादबिंदु कला अकादमी चे गोपी मुंढे,सौ सिमा मुंढे व प्रकाश शिंगाडे उपस्थित होते. लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी च्या माय नेशन माय प्राईड अभियानांतर्गत हि स्पर्धा घेण्यात आली. तब्बल 6 तास चाललेल्या या स्पर्धेमध्ये दोन गट करण्यात आले होते. बाल गटात प्रथम समृद्धी काळे, द्वितीय विभागुन रावी पाठक व रितीका लटपटे, तृतीय स्वप्नील आवंके तसेच मोठ्या गटात प्रथम अजय अवचार, व्दितीय विभागुन सोनाक्षी अवचार व सोनाक्षी राठोड, तृतीय शुभांगी रायभोळे हे विजयी झाले.
या वेळी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे गोविंद रोडे, भगत सुरवसे,गोपाळ मंत्री, संजय सुपेकर, अतुल गंजेवार, मकरंद चिनके, संभाजी वाडेवाले, बालासाहेब यादव, डॉ अर्जुन सोनवणे, जगन्नाथ आंधळे,मिथीलेश तुपकर, रत्नाकर जोशी, अभिनय नळदकर, बंडु घुले, प्रकाश घण,अजय बंग,विजय बंग, अंबादास राठोड, ज्ञानेश्वर गुंडाळे, विकास गुंडाळे, कविता साळवे,रेणु घन, इंदुमती आवंके,राणी राखे, विष्णू मुरकुटे, अरविंद लांडगे, प्रकाश टाक, अभिजीत चौधरी,सागर गोरे,विनय नाल्टे, निखील गुंडाळे, उमेश पापडु, महेन्द्र कांबळे , महेन्द्र वरवडे उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button