जाहिरात
गंगाखेडब्रेकिंग न्युज

नगर परिषद गंगाखेडच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका अंतर्गत थकबाकीदार दुकानदाराकडून भाडे वसुलीसाठी विशेष मोहीम

Spread the love

गंगाखेड प्रतिनिधी (दि,२३ ऑगष्ट)

आज दिनांक २३ ऑगस्ट रोजी गंगाखेड नगर परिषदेच्या वतीने भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या दुकानदाराकडे असलेल्या थकबाकीच्या वसुलीसाठी वारंवार नोटिसा देऊन देखील कुठलीही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे विशेष पथक नेमून वसुली मोहिमेस सुरुवात केली आहे.


गंगाखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक वसुधा फड यांनी आज प्रत्यक्ष आपल्या सहकारी अधिकारी,व कर्मचाऱ्यांसह शहरातील दुकानदाराकडील थकित असलेला कर वसुली अभियान राबवून ज्या दुकानदाराकडे जास्तीची बाकी असेल अशा दुकानदारांना नोटीस देऊन देखील कुठलाही परिणाम झाला नाही त्या दुकानांना नाईलाज स्तव सील करण्याची कार्यवाही केरण्यात आली आहे नगर परिषद प्रशासनाने आपल्या फौजफाट्यासह एक जेसीबी,एक ट्रॅक्टर ,व एक घंटागाडी व स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता सुपरवायझर,कर्मचारी सोबत घेऊन दुकानदाराने दुकाना अतिरिक्त बाहेर केलेले अतिक्रमण हटवले आहे.


मागील दोन दिवसापासून कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी तथा प्रशासक वसुधा फड यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरणारे हात गाडी फळ विक्रेते व ऑटो रिक्षा हटवण्यात आले त्यानंतर आज रोजी सर्व दुकानदारांना आपापल्या दुकानासमोरील अतिरिक्त अतिक्रमण काढून घेण्यासाठी तोंडी सांगून ही मोहीम आणखी पुढील काही दिवस पूर्ण वसुली होई पर्यंत सुरू राहील असे दैनिक न्याय टाईम्स च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे .
गंगाखेड येथील काही व्यापाऱ्यांची संपर्क केला असता व्यापाऱ्यामधून या मोहिमेचे स्वागत करण्यात आले परंतु काही व्यापाऱ्यांनी हात गाडीवाले व ऑटो रिक्षावाले यांच्या बेसिस्त वागण्याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांना अगोदर शिस्त लावावी व नंतर वसुली करावी असा नाराजीचा सूर आला

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button