राज्यपाल रमेश बैस रविवारी गडचिरोली जिल्ह्यात

लोकशाही न्युज,गडचिरोली,(दि,८डिसेंम्बर)
दि. १० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मा. रमेश बैस राज्यपाल महाराष्ट्र राज्य हे पोर्ला या गावी भेट देणार आहेत. संकल्प विकसित भारत आणि महिला सशक्तीकरण अभियान याच्या कार्यक्रम करिता ते येणार आहे. त्यावेळी कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम , तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार – खासदार उपस्थित राहणार आहे.यावेळी विविध विभागाच्या लाभार्थी ला लाभ देण्यात येणार आहे.
तसेच सर्व विभागच्या योजनेचे स्टॉल असणार आहे. प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली आहे.
संजय मीना जिल्हाधिकारी, आयुशी सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी, धनाजी पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी,राजेंद्र भुयार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,प्रशांत शिर्के प्रकल्प चालक,डॉ.सचिन मडावी सहाय्यक आयुक्त , फरेंद्र कुत्तीरकर प्रकल्प संचालक,चेतन हिवंज उपमुख्य कार्यकारी अधिकारी , तहसीलदार ,BDO, सर्व अधिकारी यांनी आज पोर्ला गावाची पाहणी करून कार्यक्रमाचा आढावा घेतला.प्रशासनाची जय्यत तय्यारी सुरू असून.सात-आठ हजार लोक कार्यक्रमाचा लाभ घेणार आहे.
