गडचिरोली
१० डिसेंम्बर ला संत जगनाडे महाराज जयंती निमित्त समाजप्रबोधन व कीर्तन

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,८ डिसेंम्बर)
वर- वधू परिचय मेळावा व जिल्ह्यातील विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम
श्री संताजी जगनाडे जन्मोत्सव समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त समाजप्रबोधन व कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन रविवार १० डिसेंवर रोजी सकाळी ११ वाजता श्री संताजी स्मृती प्रतिष्ठान सर्वोदय वॉर्ड गडचिरोली येथे करण्यात आले आहे.
यावेळी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक संजय येरणे तर प्रमुख वक्ते म्हणून छत्रपती संभाजी नगरचे संत साहित्याचे अभ्यासक प्रा. विजय गवळी, कीर्तनकार म्हणून वर्षाचे प्रसिद्ध प्रबोधनकार तथा सप्तखंजिरी वादक दीपक महाराज भांडेकर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभाकर वासेकर, प्रमोद पिपरे, सुरेश भांडेकर, देवाजी सोनटक्के, रमेश भुरसे, देवानंद कामडी, घनशाम लाकडे, राहुल भांडेकर यांनी केले आहे.
जाहिरात
