राजकीय
९ डिसेंबर ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गडचिरोली दौऱ्यावर
खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी यांची पत्रकार परिषदेतून माहिती

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,३० डिसेंबर)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचीही राहणार हजेरी
भारत देशाचे केंद्रातील गृहमंत्री अमित शहा हे ९ डिसेंबरला गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत असून विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करणार असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी यांनी आज झालेल्या सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषदेतून माहिती दिली.
९ डिसेंबर रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा गडचिरोली दौरा असून या दौऱ्याप्रसंगी गडचिरोली जिल्ह्यातील अनेक विविध विकास कामांचे व प्रकल्प प्रोजेक्टचे भुमिपुजन करण्यात येईल.कोनसरी येथील प्रोजेक्ट प्रकल्पाचे व वडसा-गडचिरोली रेल्वे लाईन चे भुमिपुजन, चिचडोह बँरेजेस प्रकल्पाचे लोकार्पण समारंभ सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती दिली.
पत्रकार परिषदेला खासदार अशोक नेते लोकसभा गडचिरोली चिमूर क्षेत्र, आमदार डॉ देवराव होळी गडचिरोली विधानसभा क्षेत्र, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, बाबुराव कोहडे लोकसभा विस्तारक, भारत खठी जिल्हा उपाध्यक्ष, अनिल कुंघाडकर माजी नगरपरिषद उपाध्यक्ष, विलास भांडेकर चामोर्शी तालुका अध्यक्ष, वर्षा सेडमाके महिला महामंत्री, अनिल तिडके युवा मोर्चा अध्यक्ष हे हजर होते.
जाहिरात
