राजकीय
अतिवृष्टीग्रस्ताला तनुश्री आत्राम ने दिली आर्थिक मदत

लोकशाही न्युज,गडचिरोली,(दि.११ऑगष्ट)
गडचिरोली व अहेरी विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रम करणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचा हात पुढे केला आहे.त्यांना आर्थिक मदत करून लाख मोलाची मदत केली आहे.
नुकतेच त्यांनी गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथे भेट देऊन अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांशी चर्चा करुन परिस्थिती जाणून घेतली. रमेश मेश्राम यांचे घर अतिवृष्टीमुळे पडल्याची माहिती मिळताच तनुश्री आत्राम यांनी मेश्राम यांना आर्थिक मदत केली. शिवाय संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
जाहिरात
