जाहिरात
गडचिरोली

भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिवस रक्तदान करून साजरा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१६ ऑक्टोंबर)
संपादक:संदिप कांबळे

१५ ऑक्टोबर ला भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पि. जे. अब्दुल कलाम यांच्या जयती दिनी पत्रकार संघ गडचिरोली यांच्या सहकार्याने गडचिरोली वृत्तपत्र विक्रेता संघटने तर्फे “भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिवस” रक्तदान करून, पेपर वाटप करणाऱ्या मुलांना भेटवस्तू व स्नेह भोजनाचा कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

पत्रकार भवन गडचिरोली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोलीचे तहसिलदार महेंद्र गणवीर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी अनिल धामोडे होते. या कार्यक्रमाला दै. भास्करचे जिल्हा प्रतिनिधी रूपराज वाकोडे लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी संजय टिपाले,लोकमतचे शाखा व्यवस्थापक राजू सहारे, महासागरचे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी, लोकमतचे मुख्य वितरक श्रीकांत पतरंगे, पुण्यनगरीचे वितरण प्रतिनिधी केशव हुकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात अनेक रकतदात्यांनी रक्तदान केले त्यात प्रामुख्याने अनिल बाळेकरमकर, लोमेश बांबोळे, प्रशांत वाढई, राजेन्द्र गव्हारे, संजय आकरे, अंकुश बोबाटे, आकाश वैरागडे, केशव हुकरे, प्रविण कांबळे यांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेन्द्र गव्हारे यांंनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष अनिल बाळेकरमकर, सचिव लोमेश बांबोळे, कोषाध्यक्ष प्रशांत वाढई, सहसचिव मारोती बाळेकरमकर, सह कोषाध्यक्ष जयंत अर्जुनकर, प्रसिद्ध प्रमुख अंकुश बोबाटे, संजय आकरे, दिलीप टेकरे, संदीप आकरे, देवा बारापात्रे, भास्कर कावळे, आकाश वैरागडे, विक्की गव्हारे, शंकर नैताम,आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button