३ महिने उलटूनही १८ मायक्रोस्कोप यंत्र चोरीचा शोध लागेना,पोलीस तपास थंड

लोकशाही न्युज गडचिरोली (दि,१६ ऑक्टोंबर)
संपादक:संदिप कांबळे
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल,दुर्गम,अविकसित म्हणून महाराष्ट्रात खूप आधीपासून ओळख आहे.विकासकामात गडचिरोली अजूनही खूप मागासलेला आहे, गडचिरोली मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातून ३ महिन्यांपूर्वी १८ मायक्रोस्कोप यंत्र चोरी झाल्याची घटना घडली होती. तक्रार करून तीन महिने उलटूनही अजून पोलिसांच्या हाती १८ मायक्रोस्कोप चोरीचा छडा लागत नसल्याचे दिसून येत आहे.पोलीस तपास थंड बसत्यात आहे. पोलीस विभागाने सदर तपास बंद केला की काय अस दिसत आहे.
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे कॉम्प्लेक्स परिसरातील शासकीय निवासस्थान असलेल्या ठिकाणी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मायक्रोस्कोप यंत्राची चोरी झाल्यानंतर अनेक ओल्या (चिकन,मटण, दारू) पार्ट्या केल्याची गोपनीय चर्चा कार्यालयात व शहरात खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे जणू कार्यालयातील कार्यरत कर्मचाऱ्यांनी १८ मायक्रोस्कोप चोरीची विल्हेवाट लावली की काय असा संशय बडावला आहे. पोलीस विभागाने याचा सुद्धा शोध लावणे गरजेचे आहे.
