रस्ता बांधकाम चौकशीसाठी ताटीकोंडावार यांचे सहकाऱ्यांसह आंदोलनाचा दुसरा दिवस

लोकशाही न्युज,अहेरी (दि,६ ऑक्टोंबर)
संपादक:संदिप कांबळे
रस्ता बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर कडक कार्यवाही करीत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करुन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, या मागणीला घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दि, ५ ऑक्टोबरपासून आलापल्ली सार्वजनीक बांधकाम कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.
अहेरी आलापल्ली या मुख्य मार्गांची झालेली दयनीय अवस्था व कंत्राटदाराच्या निकृष्ट बांधकामाबाबत अनेकदा तक्रारी निवेदन सादर करण्यात आले. तसेच रस्त्याचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असतांनाच रस्त्याची स्थिती पुन्हा दयनीय झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहतूकदारांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावरील खड्ड्यांमुळे अनेकांना मणक्याचे बळावले असून काहीजण किरकोळ जखमी झाले आहे. कंत्राटदारांनी संबंधित विभागाच्या संगनमताने निकृष्ट बांधकाम केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.
त्यामुळे या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन संबंधितावर फौजदारी कारवाईची मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी साबा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनातून दिली होती. मात्र प्रशासन स्तरावरुन कोणतीही कारवाई न झाल्याने ६५ लाखांच्या सदर रस्ता कामाची सखोल चौकशी करुन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करीत दंडात्मक कार्यवाही करावी, दुरुस्तीचे काम सुरु असतांना त्याच रस्त्यावर दुस-या कंत्राट देण्याचे नियोजन काय? त्यामुळे याची सखोल चौकशी करावी, सदर मार्गावर झालेल्या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण विकलांग झाले आहेत, त्यामुळे त्याची जबाबदारी स्विकारावी, रस्ता बांधकामाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, या मागणीला घेऊन ताटीकोंडावार दि,५ ऑक्टोंबर गुरुवार पासून सार्वजनीक बांधकाम कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.आंदोलनात विपूल खोब्रागडे, शंकर धोलगे,दीपक चालुरकर,अंवर शेख,जमीर शेख,आझाद भांडेकर,अक्षय कोलपकवार,राजेंद्र साळवे,मुकेश ,विनोद वकणपल्लिवर भाजपा तालुका उपाध्यक्ष, वाकुडकर जिल्हा उपाध्यक्ष मनसे आदींचा सहभाग आहे.
विविध संघटनांचा ठिय्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
¶¶¶¶
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष किशोर शंभरकर,रियाज शेख शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा गट), भाजप तालुका अध्यक्ष विनोद भाऊ अख्खनपल्लीवार. नामदेव आश्रम. किसान काँग्रेस अध्यक्ष तथा अहेरी विभाग आदिवासी एम्पलोयी फेडरेशन अहेरी उपविभाग, टायगर ग्रुप चे साई तुलसी गिरी,दौलत रामटेके व इतर अन्य सहकार्यांचा जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
