एस टी बसचा मागील टायर फुटल्याने एस. टी प्रवासी किशोर मेश्राम जखमी
गडचिरोली (दि,८ सप्टेंबर)
दिनांक 24 ऑगस्टला किशोर मेश्राम आपल्या व्यक्तिगत कामासाठी गडचिरोली वरून नागपूरकडे एस.टी.बस क्रमांक एम.एच 40 वाय 5258 या बसने जात असताना नागभीडच्या पलीकडील नवखेडा या गावशेजारी चालत्या एसटी बसचा मागील टायर फुटल्याने किशोर मेश्राम यांच्या अपघात झाल्याने त्यांच्या डाव्या पायाला जबरदस्त मार बसल्यामुळे त्यांचा डावापायचे हाडच तुडलेले आहे.तसेच त्यांच्या बाजूला बसलेले सेवानिवृत्त नायब तहसीलदार मनोहर दहीकर हे सुधा या अपघातात किरकोळ जखमी झालेले आहेत.अपघातात जखमी झालेले किशोर मेश्राम हे ब्रम्हपुरी येथील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर कापगते यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती असून त्यांच्या डाव्या पायावर दोनदा शस्त्रक्रिया झालेल्या असून पुन्हा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर घटनेची तक्रार अस्थीरोग तज्ञ डॉक्टर कापगते यांनी अपघाताची तक्रार ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला कळविली असून पोलीस स्टेशनचे दोन जबाबदार शिपाई अपघाती किशोर मेश्राम यांची कापगते यांच्या दवाखान्याल भेट देवून तोंडी बयान घेतलेला आहे. किशोर मेश्राम यांच्या अपघाताची बातमी कळताच त्यांच्या अनेक चहात्यांनी त्यांची ब्रह्मपूरी येथील डॉक्टर कापगते यांच्या हॉस्पिटल ला भेट देऊन त्यांना बळ दिलेली आहे.त्यांच्या शस्त्र क्रियेवर बराच खर्च झालेला असून एसटी महामंडळाने त्यांच्या खर्चाची जबाबदारी उचलावी असे किशोर मेश्राम यांच्या कुटुंबीयांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केलेले आहे.
