जाहिरात
आरोग्यव्हाहाड

चारगाव येथे कॅन्सर तपासणी शिबिर

Spread the love

सुदर्शन गोवर्धन सर्कल प्रतिनिधी
लोकशाही न्यूज (दि,२९ सप्टेंबर)

आज दि. २९ सप्टेंबर २०२३ ला सावली तालुक्यातील मौजा.चारगाव येथे विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेता विधानसभा महाराष्ट्र राज्य यांच्या विशेष प्रयत्नातून विजय किरण फाउंडेशन तर्फे फिरते कॅन्सर हॉस्पिटल चारगाव,चकमानकापूर,मानकापूर,भारपायली,सादागड हेटी या गावासाठी कॅन्सर तपासणी हॉस्पिटल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गावातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला, पॉसिटीव्ह आलेल्या लोकांना डॉक्टरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर तपासणी हॉस्पिटल नागपूर येथे रेफर करण्यात आले.
या शिबिराला पंचायत समिती सावलीचे माजी सभापती विजय कोरेवार,सरपंच ज्योती बहिरवार,गाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव कुमरे, मुरमाडीच्या सरपंच रुपाली रत्नावार,ग्रा.पं.चारगावचे उपसरपंच राजेश्वर वलके ग्रामपंचायत सदस्य निता दंडिकवार,श्रीमती निरूपा मडावी तसेच जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम, काँग्रेस कार्यकर्ते श्रीकांत बहिरवार मा.सनदकुमार बोरकर,मा.प्रवीण तलांडे पोलिस पाटील तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटल नागपूरचे कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button