
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२९ सप्टेंबर)
संपादक:संदिप कांबळे
गडचिरोली मुख्यालयातील इंदिरा गांधी चौकाच्या जवळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा महिला व बाल रुग्णालय आरोग्य सेवेतील आरोग्य व्यवस्था ही संपूर्ण परिचारिकांच्या हवाली असून वैद्यकीय अधिकारी रुग्णालयाबाहेर राहत असल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.अशा डॉक्टरांच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळे रुग्णालयातील रुग्णांचे जीव जातात याला जबाबदार कोण असा प्रश्न आरोग्य सेवेसाठी येणाऱ्या उपस्थित जनतेने व्यक्त केला आहे.
शासनाने जिल्हा मुख्यालयी सर्व सोयी सुविधा युक्त रुग्णालय निर्मिती केली पण याचा फायदा कर्मचाऱ्यांना अधिक व आलेल्या रुग्णांना कमी होत असतो या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अनेक वेळा आपल्या खाजगी व्यवसायात सांभाळण्यात घालवतात गंभीर परिस्थिती असली आणि वेळ मिळालाच तर रुग्णालयामध्ये हजर होत असतात वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याने दवाखान्यातील प्रशासन परिचारिका व वार्डातील इतर कर्मचाऱ्यांच्या हातातच असते त्यामुळे कुठलाही रुग्णाला गंभीर त्रास झाल्यास त्याच्यावर थातूरमातूर उपचार केल्या जाते.
वारंवार वैद्यकीय अधिकारी हजर नाहीत अशी टेप वाजविली जाते सदर सप्टेंबर महिन्यात रुग्णालयात जवळपास बाळंतपण झालेल्या ८ ते १० महिला व ५ ते ६ बालक दगावल्याचे चित्र आहे.
जखमी बाळांना उबदार पेठित ठेवून वैद्यकीय अधिकारी अनेक वेळा परिचारिकांना सूचना देऊन रुग्णालया बाहेर पडत असतात परिचारिकांना प्रसंगी कल्पना नसल्यास बाळ दगावल्याच्या घटना वाढत आहेत. बाळ गंभीर झाल्यानंतर स्वतःची जबाबदारी झटकून देऊन रुग्णाच्या नातेवाईकाकडून अर्जावर सह्या घेतल्या जातात या परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्या कक्षात हजर राहणे सक्तीचे करावे.
