जाहिरात
नियुक्ती/ निवड

प्रणय खुणे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,३ सप्टेंबर)
संपादक:संदिप कांबळे

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदी प्रणय खुणे यांची राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल यांनी नियुक्ती केली आहे.

प्रणय खुणे यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असून जिल्ह्यातील विविध समस्यांना त्यांनी वाचा फोडली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी ते सदैव खंभिरपणे उभे राहतात. या सर्व बाबींची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून प्रदेश सचिव ज्ञानेंद्र बिस्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिल्हा अध्यक्ष किशोर शंभरकर, ऍड. ज्योती डोके, रिजवान शेख, राजेंद्र चिमरालवार, इंदीर दुधे, प्रशांत जोशी, अजय ठाकरे, मनीषा आलाम, सुरेश अलोणे यांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्रात होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आवाज उचलून जनतेला न्याय मिळवून देण्याची हमी प्रणय खुणे यांनी दिली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button