जाहिरात
क्राईम

८ वर्षीय मुलीवर ३९ वर्षीय नराधमाचा अत्याचार, कोनसरी गावातील घटना

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली / आष्टी
संपादक : संदिप कांबळे

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी जवळील कोनसरी या गावात एका ८ वर्षाच्या मुलीवर ३९ वर्षीय नराधमाने आपल्या वासनेची शिकार बनविले. परंतू या प्रकारानंतर आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. काही दिवसाने तिला पोटात त्रास होऊ लागल्याने तब्बल महिनाभराच्या कालावधी नंतर हि घटना उघडकीस आली.

त्या पीडित मुलीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात आणल्यानंतर तिने झालेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर आष्टी पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल करून आरोपी ईबाकार दौलत मडावी वय ३९ वर्ष याला अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button