
लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.३ मार्च)
गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवणी येथे काल संध्याकाळी (दि.२ मार्च) ६:३० च्या सुमारास गावातील एक कर्णबधिर २२ वर्षीय युवती घराबाहेर पडली असता ती एकटी असल्याचे पाहून पोटफोळी नदीच्या जवळ अत्याचार करण्यात आला असून सदर युवती ला भीषण मारहाण करण्यात आली असल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याने काल रात्रीच तिला नागपूरला पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. सदर युवती हि कर्णबधीर आहे.
हि युवती या घटनेमुळे हादरून गेल्याने ती बोलू शकत नव्हती या युवतीच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झालेली असल्याने तिला बोलता येणे शक्य नव्हते. तिच्यावर अत्याचार करून तिला मारून टाकण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेल्याचे दिसून येते.
सदर युवती हि गरीब शेतकरी कुटुंबातील असून ती शारीरिकरित्या अशक्त असल्याची माहिती आहे.या युवतीला रात्री साडेदहाच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे गंभीर अस्वस्थेत उपचार करिता दाखल करण्यात आले. या वेळी महिला पोलिसासह काही अधिकारी रुग्णालयात पोहचले होते.
२२ वर्षीय कर्णबधिर मुलीवर झालेला अत्याचार हा एकेरी नसून सामूहिक असल्याची गावामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे वृत्त लिहीपर्यंत अद्याप कोणालाही पोलिसांनी अटक केली नाही आहे. या घटनेने शिवणी हे गाव आणि जिल्हा हादरून गेले आहे.
