
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १२ मे)
गडचिरोली शहरातील चारही मुख्य मार्गावर ( चंद्रपूर, चामोर्शी, आरमोरी, धानोरा) संध्याकाळच्या सुमारास मोकाट जनावरे गाई,बैल, म्हशी व कुत्रे हे मुख्य मार्गावरती फिरत असतात व शहरातील नागरिकांना व वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांस अडचण होत आहे. तसेच अपघात होत आहेत व काही जणांना अपघातामध्ये आपला जिव सुद्धा गमवावा लागत आहे.
त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी उबाटा गटाचे पदाधिकारी यांचेकडून मुख्याधिकारी नगरपरिषद गडचिरोली यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी युवा सेना जिल्हाप्रमुख पवन गेडाम,धानोरा तालुकाप्रमुख किरण शेडमाके,गडचिरोली तालुकाप्रमुख कुणाल कोवे, उप तालुका युवाप्रमुख अतुल नैताम, गडचिरोली शहर प्रमुख वैभव सातपुते, युवा उपतालुका प्रमुख रोशन उरकुडे हे निवेदन देतेवेळी हजर होते.
जाहिरात
